सुलभ योग साधना
              विचारधन 
 
योगी मनोहर हरकरे यांचे विचारधन.

०१ :- प्रेम व परोपकार हाच एकमात्र मानव धर्म आहे.

०२ :- गुरुपूजन म्हणजे व्यक्ती पूजन नव्हे , ते तत्व पूजन आहे.

०३ :- स्वतः ला अधः पतनाकडे न नेता आपला उद्धार आपण स्वतः करा, सुयोग्य कर्म केल्यास 'नराचा नारायण' होणे शक्य आहे.

०४ :- 'स्वर्ग' आणि 'नरक' या मानवी मानाच्या चांगल्या व वाईट अवस्था आहेत.

०५ :- शरीर हे कर्माचे उपकरण आहे. आम्ही म्हणजे आमचे शरीर नव्हे.

०६ :- समाधानी वृत्तीने जे चांगले कार्य केले जाते ते म्हणजे यज्ञ होय.

०७ :- जीवात्मा हे परमात्म्याचे स्फुल्लिंग आहे. ज्याची व्याप्ती वाढवून जीवात्मा परमात्मा प्राप्त होऊ शकतो.

०८ :- आसक्तिरहीत कर्म केल्यास माणूस परमात्मा गतीस पोहोचू शकतो.

०९ :- शांती, क्षमा व त्याग हे अध्यात्मिक प्राप्ती करिता आवश्यक गुण आहेत.

१० :- रामायण व महाभारतातील युद्ध प्रसंग हे प्रत्यक्ष ऐतिहासिक युद्ध नसून साधकाच्या चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तीचा संघर्ष आहे.

११ :- संयम हे सर्व अध्यात्माचे मूळ आहे. मनास स्थिर ठेवण्यास योग साधना आवश्यक आहे.

१२ :- भक्त हा सुद्धा योगीच आहे कारण तो त्याचे भगवंताशी सतत जोडलेला असतो.

१३ :- समाधी अवस्था साधना प्रवण जीवनाचे सर्वोच्च स्थान होय.

१४ :- प्रत्येक मनुष्य सुयोग्य कर्म केल्यास पूर्णत्वास पोहोचू शकतो.

१५ :- ज्या परमेश्वर स्वरूप अध्यात्मिक गुरुवर आपली श्रद्धा आहे, त्याचे शरीर त्याग करतांना ( मरतांना ) ध्यान केल्यास क्लेश कमी होऊ          शकतात.

१६ :- हिंदू ही जाती किंवा धर्म नाही, ही एक श्रेष्ठ परंपरा आहे.

१७ :- ऋषीमुनींद्वारा लिखित आमच्या सर्व ग्रंथांमध्ये महान वैज्ञानिक सिद्धांत आहेत, ज्यांना समजून घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

१८ :- आजचा मानव समाज कथित संस्कृती आणि धर्म पंथांमध्ये निष्कारण विभाजित झाला आहे . तो पुन्हा पुनर्गठीत होऊ शकतो. वैदिक           परंपराच माणसा-माणसातील दरीमिटवू शकेल.

१९ :- केवळ ग्रंथ पठाण केल्याने व प्रवचने ऐकल्याने ज्ञान प्राप्त होणार नाही. प्रत्यक्ष ध्यानसाधना केल्यानेच ज्ञान प्राप्त होईल.

२० :- रामायण तथा महाभारत केवळ हिंदूंचेच ग्रंथ नाहीत, तर ते विश्वातील समस्त मानव जातीचे महान ग्रंथ आहेत ज्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाचे,          ध्यान साधनेद्वारा मिळविलेल्या प्रत्यक्ष अनुभूतींचे वर्णन वैज्ञानिक पद्धतीने केलेले आहे हे आम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

२१ :- या जगाने जाणावे कि प्राचीन विश्व खरोखरीच वैदिक होते. ( वैदिक म्हणजे ज्ञानमय ) ही ज्ञानमय परंपराच जगात पुनर्स्थापित होऊ           शकेल. ' वैदिक विश्व ' चे हेच ध्येय आहे.

 
  Designed by Prathamesh Katwe.