सुलभ योग साधना
              सर्वांगासन
 
 

आसनपुर्व स्थिती :- पाठीवर सरळ झोपावे.

   

प्रक्रिया :-

१ :- दोन्ही हात कंबरेजवळ ठेऊन दोन्ही पाय वर उचलून काटकोनात्मक अवस्थेत ठेवावेत.
२ :- नंतर दोन्ही पायांसह नितंबास वर उचलून सर्व शरीर फक्त खांद्यावर आधारित ठेवावे आणि त्याचबरोबर कंबरेस दोन्ही हातांनी आधार        देऊन शरीरास अधिक वर उचलण्याचा प्रयत्न करावा.
३ :- डोळे आणि पायांचे अंगठे एका समान रेषेत आणावेत.
४ :- पायाच्या अंगठ्याकडे डोळ्यांनी एकटक बघावे.
५ :- श्वास-प्रश्वास मंद मंद करावा.
६ :- नंतर हात कंबरेपासून अलग करून जमिनीवर ठेवावेत.
७ :- पाय थोडे मागे घेऊन हळू हळू खाली आणावे आणि त्याच बरोबर नितंब जमिनीस लावावे.
८ :- हात व पाय एकमेकांस समांतर ठेवावेत.
९ :- हात व पाय त्यांच्या दिशेत जमिनीवर ठेवावे. ( हात डोक्याचे वर जमिनीवर )
१० :- नंतर झोपूनच हाताच्या बाजूस हात आणि पायांच्या बाजूस पाय ताणावे. ह्यामुळे पाठीस सुखकारक वाटते.
 
लाभ :-
गळ्यांतील थाईरॉइड पुष्ट आणि कार्यप्रवाण बनल्यामुळे शरीर संपूर्ण निरोगी आणि दीर्घजीवी होते. मस्तकात रक्त प्रवाहाचे प्रमाणित वहन झाल्यामुळे बुद्धीची क्षमता अधिक वाढते. शिर्षासनामुळे स्वभावांत क्रोध वाढतो त्याचे ह्या आसनामुळे निराकरण होते. शीर्षासनापेक्षा हे आसन जास्त लाभदायी आहे म्हणून शीर्षासनाएवजी हे आसन करावे.
 
  Designed by Prathamesh Katwe.