सुलभ योग साधना
              पवन मुक्तासन
 
 

आसनपुर्व स्थिती :- पाठीवर सरळ झोपावे.

   

प्रक्रिया :-

१ :- उजवा पाय जांघेतून उचलून शरीराशी काटकोन करावा. नंतर पाय गुडघ्यांत दुमडून दोन्ही हातांनी धरावा त्याचबरोबर हनुवटी गुडघ्यांस        लावावी.
२ :-  दोन्ही हात डोक्यावर सरळ उचलून एकमेकांशी समांतर ठेवावेत.
३ :-  दोन्ही हातांनी त्या- त्या बाजूच्या पायांचे अंगठे धरावे.
४ :- गुडघे वर न उचलता कपाळ (मस्तक ) गुडघ्यास लावावे.
५ :- त्याच अवस्थेत दोन्ही हातांची दोन्ही कोपरे गुडघ्यांच्या बाजूने जमिनीस लावावीत ही आसनाची पूर्ण स्थिती आहे.
६ :- कपाळ (मस्तक ) आणि कोपरे वर उचलावीत.
७ :- हात पूर्ववत एकदुसऱ्यांस समांतर ठेवावेत.
८ :- दोन्ही हात खाली घेऊन एकमेकांशी  व्यासकोन करून जमिनीला समांतर ठेवावेत.
९ :- शेवटी दोन्ही तळहात जमिनीवर ठेवावे . याप्रकारे  पश्चिमोत्तानासन पूर्ण केले जाते.
 
आवश्यक सूचना :- खाली वाकताना श्वास हळू हळू सोडावा आणि वर होते वेळी श्वास  हळू हळू घ्यावा.
अधिक अभ्यासानंतर (मस्तक ) कपाळ गुडघ्यांवर ठेऊन श्वास रहित अवस्थेत राहावे.
 
लाभ :-
साएटीका , स्पॉन्डिलायटिस , मूत्रपिंड ,वायुप्रकोप ,वातप्रकोप विकारांवर लाभदायक.
 
  Designed by Prathamesh Katwe.