सुलभ योग साधना
              मत्स्यासन
 
 

आसनपुर्व स्थिती :- पाठीवर सरळ झोपावे.

   

प्रक्रिया :-

१ :- जमिनीवर झोपूनच उजवा पाय प्रथम उचलून डाव्या मांडीवर ठेवावा व पद्मासन घालावे.
२ :- दोन्ही हात कानांजवळ पालथे ठेऊन हाताच्या बळावर मस्तक मागून आतमध्ये ढकलावे आणि पाठीची वर कमान बनवावी.
३ :- पद्मासन (मांडी) जमिनीवर ठेऊन पायांचे अंगठे धरावे.
४ :- नंतर कानांच्या दोन्ही बाजूस जमिनीवर हात पालथे ठेऊन मस्तक व पाठ सरळ करून जमिनीस लावावी.
५ :- नंतर डावा पाय काढून सरळ करावा.
६ :- त्यानंतर उजवा पाय सरळ करावा.
७ :- हात मस्तकाच्या मागून घेऊन जमिनीवर सरळ ठेवावेत.
८ :- हीच क्रिया नंतर डावा पाय उजव्या मांडीवर ठेऊन पद्मासन घालून करावी. बाकी सर्व आसन क्रिया पूर्वीप्रमाणेच करावी.
 
लाभ :-
मूत्रपिंड, हर्निया, अंडवृद्धी, स्पॉन्डिलायटिस आणि पाठीच्या सर्व तक्रारींवर लाभप्रद. हे आसन दररोज केल्याने साधक वयाने लहान दिसतो आणि चिरतरुण राहू शकतो.
 
  Designed by Prathamesh Katwe.