सुलभ योग साधना
              महामुद्रा
 
 

आसनपुर्व स्थिती :- दोन्ही पाय सरळ जमिनीवर ठेवावे . हात नितंबाजवळ जमिनीवर ठेवावे . टाचा जुळलेल्या एकमेकांस लागून आणि पायांची                             बोटे दूर असावीत.

   

प्रक्रिया :-

१  :- उजवा पाय उजवीकडे उचलून ३० अंश चा कोन करून ठेवावा.
२  :- डावा पाय गुडघ्यात वाकवून गुडघा अशाप्रकारे उभा ठेवावा कि डाव्या पायाची टाच गुदद्वारास लागेल .याच अवस्थेत डाव्या पायाचा गुडघा        जमिनीस टेकवावा.
३  :- दोन्ही हात वर उचलून प्रथम जमिनीस समांतर ठेवावेत.
४  :- नंतर दोन्ही हात आणखी वर उचलून अशा प्रकारे एकमेकांस समांतर ठेवावेत कि दोन्ही हाताचे तळवे एकमेकांसमोर राहतील.
५  :- दोन्ही हातांनी उजव्या पायाचा अंगठा पकडावा.
६  :- नंतर गुडघे वर न उचलता मस्तक गुडघ्यास लावावे . पर्याप्त अभ्यास झाल्यावर दोन्ही हातांची कोपरे जमिनीस लावावेत.
७  :- मस्तक आणि कोपरे वर उचलावीत.
८  :- दोन्ही हात वर करून एकमेकांस समांतर ठेवावेत.
९  :- दोन्ही हात बाजूने खाली घेऊन जमिनीला समांतर ठेवावेत.
१० :- दोन्ही हात जमिनीवर नितंबाच्या बाजूने ठेवावेत.
११ :- डावा पाय सरळ करून समोर ठेवावा.
१२ :- उजवा पाय पूर्वस्थितीत घ्यावा.
१३ :- नंतर डावा पाय डाव्या दिशेने ३० अंशाचा कोन करून ठेवावा आणि उजव्या पायाची टाच याप्रमाणे ठेवावी कि गुदाद्वारांस लागेल.
१४ :- बाकी सर्व क्रिया पूर्वीप्रमाणेच कराव्यात.
 
आवश्यक सूचना  :- मस्तक खाली झुकवितांना श्वास सोडवा आणि वर घेते वेळी श्वास घ्यावा.
मस्तक गुडघ्यांवर ठेवतेवेळी श्वासाचा निरोध करणे कुंडलिनी जागृतीसाठी अधिक लाभदायक आहे.
 
लाभ :-
साएटीका , स्पॉन्डिलायटिस , वायुप्रकोप आणि कुंडलिनी जागृतीसाठी लाभकारक
 
  Designed by Prathamesh Katwe.