सुलभ योग साधना
              अर्ध मच्छेन्द्रासन
 
 
   

प्रक्रिया :-

१ :- दोन्ही पाय समोर ठेऊन दोन्ही हात नितंबाचे बाजूस ठेवावे.
२ :- प्रथम उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या पायाच्या खालून घालावा.आणि उजवी टाच डाव्या नितंबास लावावी.
३ :- नंतर डावा पाय उजव्या गुडघ्याच्या उजवीकडे ठेऊन डाव्या पायाचा गुडघ्यास काटकोन करावा.
४ :- उजवा खांदा डाव्या गुडघ्याच्या डाव्या बाजूने लावून उजव्या हाताने डाव्या पायाची बोटे पकडावी.
५ :- नंतर डावा हात डाव्या बाजूने मागे फिरवून उजव्या जांघेवर ठेवावा, आणि याप्रमाणे संपूर्ण शरीर डाव्या बाजूस वळवून मागे बघावे.
६ :- नंतर डावा हात आणि डोके समोर घेऊन उजवा हात सोडावा.
७ :- डावा पाय समोर ठेवावा.
८ :- उजवा पाय समोर ठेवावा.अशाप्रकारे पूर्वस्थितीत हळू हळू यावे.
९ :- हीच क्रिया प्रथम डावा पाय उजव्या पायाच्या खाली घालून आणि उजव्या नितंबास  डावी टाच लावून करावी.
 
लाभ :-
पोट व पाठीच्या सर्व तक्रारी , वातविकार ,हर्निया ,अंडवृद्धि ,स्पॉन्डिलायटिस ,कंबरेच्या सर्व तक्रारी यांवर लाभदायक.
 
  Designed by Prathamesh Katwe.